सहज कळाव इतक सोप, बाप नावाच नात नसत !! सगळं काही कमावून शेवटी, स्वतः मात्र शून्य असत !! फाटके कपडे, तुटकी चप्पल, सगळं काही लपवत असत! बाळा तुला काय हव?? तरीही ते विचारत असत. उन्ह वारा असो थंडी , त्याच त्याला काही नसत !! बाळ झोपलय ना शांत, यातच त्याच सुख असत!! मनातलं प्रेम मनातच लपवून,चुकलो तिथे रागवत असत ! उद्याच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी, आज मुल घडवत असत !! बाप नावाच नात हे, इतक सोप नसत !! करंगळी धरून चालणार, भेटल्यावर ते जाणवत असत !! हट्ट तो कसा होता??, स्वतःला तेव्हा विचारत नसत !! बालपणी केलेल्या हट्टाला, आपल्याच पोरात बघत असत !! बाप नावाच नात हे, असच व्यक्त होत नसत !! न बोलून सुद्धा ते , खूप काही सांगत असत!! थकले जरी हात त्याचे, बापपण थकत नसत पोर कितीही मोठ झाल तरी, बापाशिवाय अपूर्ण असत! लाख असतील सोबत जरी, त्याच असणं ताकद असत!! मागे वळून पाहिलं तरी , बापाशिवाय कोणी नसत ! ✍️योगेश
"अडगळीतली वही !" आज जुन्या पुस्तकात मला माझी जुनी वही सापडली. धुळीत पडलेली ती वही नकळत हातात आली आणि त्यातील एक एक ओळ वाचताना माझ्यातच मी हरवून गेलो. मनापासून लिहिलेल्या त्या ओळी, अडगळीत त्या वहीत कुठेतरी पुसट होत चालल्या होत्या. क्षणभर मीही पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून गेलो आणि नकळत जुन्या क्षणाना पुन्हा आपलस म्हणू लागलो पण तिथेच मन क्षणभर सावध झालं आणि पुन्हा मला वर्तमानात घेऊन आल. अस म्हणतात जूनं जितक दिसायला सुंदर असत तितकच ते वेदना सुद्धा देत आणि म्हणूनच की काय कित्येक वेळा जून आठवलं की आपसुक डोळ्यातून पाणी येतं. कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे सुद्धा. म्हणूनच जुन्या वहीच पान उघडताना तेवढचं सावधही असाव लागत. कारण त्यात किती वाहत जायचं हे आपणच आधी ठरवावं लागत, नाहीतर आठवाचा पाऊस पडायला लागल्यावर भिजण्या शिवाय पर्याय नसतो. म्हणूनच मी हल्ली जुन्या आठवणींन पासून जरा दूरच असतो पण ती आठवण जर अचानक समोर आली तर मात्र त्याला काही पर्याय नसतो. माणूस नजरेला बंधन घालू शकतो, पण मग मनाच काय? असाही प्रश्न कधीकधी पडतो आणि सगळच चित्र बदलायला लागत. कारण नकळत मग नजरे समोर एखादी आठवण आलीच त...