सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे का?.. मन का सारख काहीतरी विचार करतं.. आणि काहीच न सापडल्यावर उदास होऊन गप्प बसतं.. असंख्य विचारांच हे वादळ आता का कुठे थांबत नाही? ?. की विचार करुच नये आणि त्यावेळी मनाने अजुन असंख्य विचाराच गाठोडं समोर उघडून बसावं.. काहीच कळेनासं झालंय.. मनातल्या कोपर्यात कोणीतरी सतत का आठवावं .. विसरुन जावं त्यास म्हटलं तरी त्याने पुन्हा पुन्हा समोर का यावं ... असा गोंधळ झालाय सगळा म्हटलं तरी मन कोणाची तरी खुप आठवणं काढतंय अस सांगावं.. की सांगुच नये कोणास.. मग मनाच वादळ थांबेल तरी कस .. असा प्रश्न येतो.. मी आणि माझ मन म्हटलं तरी हे तिसर कोण येतं आमच्या मध्ये... आमच्या गप्पा मध्ये ही तिसरी कोण जिचा विषय हे मन सारखं काढतंय.. . गप्प बस रे मना.. म्हटलं तर त्याने पुन्हा पुन्हा तेच बोलावं.. समोरची व्यक्ती गप्प बसतवता येते.. पण या मनाच काय करावं.. फक्त आठवणं.. पण असं म्हणतात की आपल्याला ज्या व्यक्तीची आठवणं सारखी येते ती व्यक्तीही आपली तेवढीच आठवणं काढत असते.. खरंच अस असत का ??.. की फक्त मनाचे खेळ सगळे हे.. नकोच तो विचार पुन्हा आता.. नको रे मना .. तुलाही सहन होतं नाही आणि मलाही.. जाऊ दे तो विषय .. मग मन बंड करून उठावं.. हातात लेखणी घेऊन स्वतःस पानांवर उतरावं. . तरीही शांत झालं तर ठीक हे मन नाहीतरी पुन्हा मला छळत रहावं.. खरंच मनाचा ठाव शोधता येईल का??.. ..
-योगेश खजानदार...
रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग, खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply