मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्बीण (कथा भाग २)

   कामावर जाताना बाबांच्या डोक्यात सदाला दुर्बीण कशी घेऊन द्यावी हाच विचार होता.  आपली परिस्थिती जेमतेमच पण मुलाची स्वप्न मात्र खूप श्रीमंत असे त्यांना वाटत होते.
  दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात.
"काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?"  बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे.
"नाही शेठ विशेष काही नाही!!"
"आल्यापासून पाहतोय कुठेतरी गुंग आहेस?"
"सदाशिवने काल दुर्बीण हवी आहे अशी मागणी केली, पण शेठ दुर्बीण घ्यायची म्हणजे ती महाग असणारच , त्याला त्यातून आकाशातले तारे पहायचे जवळून!!"
"पोराचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचं, आज दुर्बीण म्हणेन उद्या अजुन काही ,सगळेच असे पुरे करणार आहेस का लाड ?"
" नाही शेठ त्याला मला दुर्बीण घेऊन द्यायचीये!! हे एवढस स्वप्न मला पुर करायचं आहे!!"
"नक्की करशील रे विनायका !! पण कामाचा तान नको जास्त घेऊस !! "
"नाही !!"
    बाबा संध्याकाळी घरी आले दिवसभर विचार करून त्यांना काय करावे तेच कळेना.
"आई , बाबा आले आहेत !!" सदा घरात येणाऱ्या बाबांकडे बघत म्हणाला.
"काय रे सदा , आज अभ्यास नाही वाटत?"
" अंगणात बसतोय आता अभ्यासाला बाबा!!" सदा बाबांकडे पाहत म्हणाला आणि अंगणात निघून गेला.
"आज त्या कुळकर्ण्या सावकाराला ५००₹ मागून बघितले! तर म्हणे आदीचेच दिले नाहीत अजुन आणि आजून कर्ज कस देणार !!" बाबा आईकडे पाहत म्हणाले.
" आता पुन्हा कर्ज कशाला काढायचं?"
"लता सगळी चौकशी केली, त्या दुर्बिणीच्या बद्दल सगळी माहिती काढली मी म्हणून त्याला पैसे मागितले!!" बाबा उत्साहात बोलत होते.
" त्या दुर्बिणीच खुळ तुमच्या डोक्यातून गेलच नाही का आजुन?" आई एकदम रागात म्हणाली.
"खुळ काय म्हणतेयस लता , आपल्या मुलाचं स्वप्न म्हण हवं तर!"
"आहो पण आपल्याला जमणार का ते ??"
"प्रयत्न तर करूयात!!" बाबा अंगणातल्या सदा कडे पाहत म्हणाले.
बाहेर सदा आकाशातील चांदण्या मोजण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एखादा निखळणारा तर पाहून त्याकडे कुतूहलाने पाहत होता. बहुदा आपल्या स्वप्नांना जवळ करण्याचा प्रयत्न करत होता.
  बाबांना काही केल्या दुर्बिणी शिवाय काही दिसत नव्हत. सावकार कर्जही देत नाही म्हटल्यावर बाबांना दुसरा मार्गही सुचत नव्हता. खूप विचार झाल्यावर शेठना पैसे मागून पहायचं अस त्यानं ठरवल. अशाच विचारत आकाशात सूर्यकिरणांचा प्रकाश पडू लागला. रोजच्या प्रमाणे सगळ आवरून बाबा कामावर गेले.
शेठला पैश्याची मागणी कशी करावी हेच त्यांना कळेना. शेवटी त्यांनी विचारलेच.
"शेठजी , थोड विचारायचं होत तुम्हाला!!"
"अरे विनायका , बोल काय काम आहे ??" शेठजी कुतूहलाने विचारू लागले.
"शेठ मला ५००₹ मिळतील का ?" बाबा शेजारी ठेवलेल पुस्तकं पाहत म्हणाले.
"विनायका, कशाला रे हवे एवढे पैसे ??"
"सदाला दुर्बीण घ्यायची आहे!!"
"विनायका, असते तर नक्की दिले असते रे पैसे , पण सध्या तुझा शेठ थोडा अडचणीत आहे !!"
"ठीक आहे शेठ!!" बाबा बोलत बोलत सर्व काम करत होते. शेठ कढून ही पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांना आता पैसे मागावें तेच कळेना.
  स्वप्न पाहताना कदाचित मी कमी पडलो असेन पण माझ्या मुलाला प्रत्येक स्वप्न मिळावं असं बाबांना वाटत . दिवस सरला आणि बाबा आणीं सदा जेवण आटोपून निवांत आंगणात पडून चांदण्या पाहत होते .
"बाबा , ते पहा त्या चांदण्या एकत्र केल्या की एक चित्र तयार होते !!"सदा उत्साहाने म्हणत होता.
"कोणत रे सदा ??"
" आपल्या सायकलच!!"

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...