मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग-४)

माझ्या मनाचा थोडाही विचार का केला नाही समीरने, तो असा का निघून गेला. अशा विचारात सायली रात्रभर जागीच राहिली. सकाळच्या वेळी सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण तिला प्रतीक्षा होती ती समीरच्या शुभेच्छाची . संध्याकाळी सायलीच्या घरी सगळे जमले.
"काकु समीर??" सायली उस्कुतेने विचारू लागली.
"तो नाही आला, त्याला बर वाटत नाही म्हणाला!! " आई सायलीकडे पहात म्हणाली.
"सायली घरातून बाहेर पहात गच्चीवर पाहू लागली. समीर गच्चीवर बसलेला दिसला. पण तो आला नाही. तुषार , सचिन सगळे आले. सायलीची आई तिला बोलावू लागली. सगळे मिळून तिचा वाढदिवस साजरा करू लागले. पण सायलीच मन काही त्यात लागतं न्हवत. तिच मन समीर का आला नाही यातच गुंतून राहील होत.
"सायली ,समीर नाही आला ते ??" सचिन सायलीला विचारू लागला.
"अरे त्याला बर वाटत नाही म्हणे!! "
"सायली तुझा वाढदिवस आणि समीर नाही आला?? अस कस वागू शकतो तो?? " सचिन तिच्याकडे पाहत ! म्हणाला.
" जाऊ दे अरे !! त्याला बर वाटत नाही म्हणून आला नाही तो!! बाकी काही नाही!!" सायली सावरासावर करत म्हणाली.
"काही नाहीं !! तो असाच आहे बघ!! कालच मला म्हणत होता , सायलीच्या वाढदिवसाला मला यायचं नाही म्हणून!! "
"पण का असे !!" सायली अगदी मनातुन विचारू लागली.
"त्याला तुला बोलायचं नाही, म्हणत होता की सायली चांगली मुलगी नाही म्हणून!!  मला तिच्याशी कोणतही नात ठेवायचं नाही !! " सचिन एका वेगळ्याच उद्देशाने बोलू लागला.
"काय असा म्हणाला समीर ??" सायलीला सचिनच्या या बोलण्याने धक्काच बसला.
"हो!! तो म्हणे सायली माझ्या उगाच मागे मागे असते !! तिला काही कळतं नाही!! " सचिन खोट्या शब्दाची एक रेष सायलीच्या मनात ओढू लागला.
"अस असेन तर मीही नाही बोलणार त्याला, मी वाईट आहे ??  तो बोललाच कस अस.
"जाऊ दे सायली आता हा विषय इथेच संपव!! आणि समीरशी बोलूच नकोस!!त्याचे विचार तुझ्याबद्दल चांगले नाहीत !! " सचिन अगदी मनातली आग ओकत बोलू लागला.
  सायली मनातुन पूर्ण उध्वस्त झाली. ज्या समीरला आपण एवढं मनापासून आपलं समजल तो माझ्या बद्दल असे बोलावा याचा तिला विश्वासाचं बसेना. ती कित्येक वेळ कोणाशी काहीच बोलली नाही. सगळे आलेले मित्र, समीरची आई सगळे निघून गेले. सायलीला तेही लक्षात आले नाही. एकांतात बसून ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. इकडे गच्चीवर सचिन आपल्या वहीत सायलीला शब्दांमधे लिहीत होता तिच्या असण्याला आपल्या शब्दात सांगत होता. त्या वहीची कागदे ते सगळं जड मनाने टिपून घेत होते..

"तुझ्या असण्याची जाणीव मला
ही हळुवार झुळूक का द्यावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी

हे फितूर झाले वारे मजला
कोणती ही आठवण यावी
तुझ्या सुंदर पानांच्या वहीत
एक ओळ माझी दिसावी

नसेल आज तुझ्या जवळ मी
कोणती ही सल मनात असावी
तुझ्या पासून दुर राहुन मी
स्वतःस आज का शिक्षा द्यावी

सांग वाऱ्यास या सारे काही
खोटी सारी गोष्ट असावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी!!! 

समीर सारे काही मनातल त्या वहीत लिहिताना कित्येक वेळ तिथेच बसून होता. गच्चीवरून खाली येताच आईने त्याला सायलीकडे का आला नाहीस म्हणून विचारले असता त्याने काहीच न बोलता घरातून बाहेर निघून गेला. बाहेर जाताना सायली त्याला समोरच दिसली. पण यावेळी सायली समीरकडे पाहूनही न पाहिल्या सारखे करून निघून गेली. समीरला याच थोड नवल वाटलं पण त्याने याचा विचारही केला नाही.
आज कित्येक वर्षे मनातल सगळं सांगणारे ते दोघं एकमेकांना अनोळखी झाले होते. समीर बाहेर जाताना त्याला तुषार वाटेवरच भेटला.
"काय रे समीर!! आला नाहीस सायलीच्या वाढदिवसाला? " तूषारचा ओठांवर वेगळेच हास्य होते.
"नाही अरे !! बरं वाटतं न्हवत म्हणून नाही आलो!! " समीर तुटक बोलत होता. त्याला तूषारला बोलावं वाटत न्हवत.
"अरे सायली तर म्हणाली की तुला तिने सांगितलच नाही म्हणून!! "
"जाऊदे अरे !! जातो मी!!" समीर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता.
"अरे थांब रे!! काय भांडलास की काय सायलीशी!! मला म्हटली ही होती की फार भांडतोस म्हणून तिला!! भेटते मला ती तेव्हा सांगत होती!! "
"मला याविषयी काही बोलायचं नाही !! तुषार मी जातोय.
समीर तिथून निघून गेला त्याला हे सारं नकोस झाल होत. समज गैरसमज आणि नात्यांच्या डावपेचात समीर आणि सायली हे नात कोमेजून जात होत.

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...