मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग -५)

समीर आता कोणाशीच जास्त बोलत न्हवता. सायली आणि त्याच्यामध्ये आता बोलण पूर्ण बंद झाल होत. पण ते नात जे कोमेजून गेलं होत त्याला आता कुठेतरी विसरायचं होत. सायली पण आता समीरकडे जास्त येतं जात न्हवती. इतकं सुंदर नात गैरसमजातून उध्वस्त झाल होत. समीर आता दुसऱ्या गावाला जाण्यासाठी  विचार करत होता. कदाचित समोर असलेल्या सायलीला विसरायचं होत.म्हणूनच इथून त्याला बाहेर जायचं होत.
"आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!" समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
"बोल ना समीर!! काय झालं!!"
"आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!"
"समीर !! अरे तू हे काय म्हणतोय !! परगावी !! या आईला सोडून जावं वाटेनं का रे तुला??" आई डोळ्यात अश्रू पुसत म्हणाली.
  आई अशी म्हणताचं समीरला अश्रू अनावर झाले.
"नाही आई !! पण संधी चांगली आहे !! आणि तूही ये ना तिकडेच नंतर !!! " समीर स्वतःला सावरत म्हणाला.
" अरे !!पण जावच लागेल का??"
"हो आई!! संधी चांगली आहे !!! "
"तुझ चांगलं होणार असेन तर मी नाही अडवणार तुला जा तू!!!" समीरची आई मनाला सावरत म्हणत होती. तिला त्याला अडवायच न्हवत. पण त्याचा विरह सहन करण्याची ताकद तिच्यात न्हवती.
कित्येक वेळ आई आणि समीर बोलत होते. सायली अचानक घरात येताना समीरला दिसताच तसेच समीर बाहेर निघून जाऊ लागला.
"काकु!! " समीर ची आई आतून बाहेर येत होती. समीर न बोलताच बाहेर निघून गेला होता.
"काय सायली !! "
"काकु काम होते तुमच्याकडे!!" सायली समीरच्या आईला अश्रू पुसताना पहात म्हणाली.
"काकु तुमचा चेहरा आज थोडा उदास का वाटतोय !! काहीं झाल का ??" सायली ने समीरच्या आईचे भाव बरोबर टिपले होते.
"काही नाही सायली !! मुलगा आपल्या पासून दूर जातोय म्हटलं की आईला त्रास होतोच !! "
"म्हणजे काय काकु!!"
"समीर परगावी जातोय !! नोकरीसाठी!! " समीरची आई असे म्हणताच सायलीला काय बोलावे तेच कळेना.
"पण अचानक कसकाय??"
"चांगली संधी आहे म्हणाला!! मला ही त्याला अडवाव वाटलं नाही !! शेवटी मीही एक आईच ना , मुलाच्या विरहाच्या विचारानेच डोळ्यात अश्रू आले!! पण त्याच चांगलं होत असेन तर मी कशाला अडवू!!" समीरची आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. सायली कित्येक वेळ भानावरच न्हवती.
"तुझ काही काम होत म्हणालीस!!!" समीरची आई सायलीला विचारत होती.
"हो काकु !! पण विसरले मी काय काम होत ते!! मी नंतर येते !!!" अस म्हणत सायली तिथून बाहेर पडली.
सायली कित्येक वेळ घराच्या बाहेरच समीरच्या विचारात आणि तो येण्याची वाट पहात थांबली. असा कसा  कसा जाऊ शकतो समीर. त्याला एकदाही हा निर्णय मला सांगावा अस वाटल नाही. का वागत असेन तो असा माझ्याशी? पण मला तरी त्रास का व्हावा त्याच्या जाण्याचा. मी इथे का थांबली आहे त्याची वाट पाहत. का?? मी प्रेम तर नाहीना करत त्याच्यावर.!! नाही नाही!! मी वाईट आहे समीरच्या नजरेत मी वाईट आहे. मी नाही बोलणार त्याला. तो माझ्यामुळेच चालला आहे दुर!! असा कसा वागू शकतो तो!! पण मी का म्हणून बोलू त्याच्याशी!! कित्येक वेळा मी समोर आले त्याच्या तरीही तो मला बोला नाही.  वाढदिवसाला ही आला नाही. नाही नको !! मी बोलले तर परत म्हणेन की मी मागे मागे असते म्हणून!! नाही नकोच !! हो मी मान्य करते की मी करते प्रेम त्याच्यावर !! पण मीच का बोलायचं!! नाही मी नाही बोलणार!! तो जाणार असेन तर जाऊदे !! त्याच्या नसण्याचे दुःख मी सहन करेन पण मी नाही बोलणार त्याला !! समीर एवढं छान नात आपल अस का रे तुटलं सांग तरी!! मी नाही बोलले तरी तू बोल !! माझ्या मनात फक्त तूच आहेस!! पण मला वाईट समजून तू माझ्याशी अस नकोस वागू रे !! मी नाहीये वाईट!!
  असंख्य विचारांचा कल्लोळ चालू होता सायली फक्त विचार करत होती. समीर पुन्हा तिच्या समोर यावा आणि तिला बोलावा एवढंच तिला हवं होत. मनातल सार काही बोलायचं होत. पण मीच का ?? हेच फक्त अडवत होत. सायली विचार करत असताना समीर तिच्या अचानक समोरून जाताना तिला दिसला. त्यानं पाहिलं तिच्याकडे पण तो बोलला नाही. सायली फक्त बघतच राहिली.
समीर घरात निघूनही गेला. सायली तिथेच उभी होती. तिला वाटलं होत समीर तिला सांगेन की तो चाललाय पण तो बोललाच नाही. घरी समीर गेला आणि सायली बद्दल मनात असंख्य विचारांमध्ये दंग होऊन गेला. कशासाठी सांगू मी तिला, की मी आता कायमचा निघून जातोय इथून!! त्याचा काही फरक पडणार नाहीये आता !! ती पाठमोरी जातानाच जेव्हा तिच्यासाठी कविता लिहिली तेव्हाच ती माझ्या मनात घर करून राहिली होती!! प्रत्येक क्षण एकमेकांना सांगणारे आम्ही , पण ती काहीच सांगत न्हवती!!  मग मी का सांगू की मी आता इथून निघून जातोय!! आणि असही मी गेलो तरी काय फरक पडणार आहे तिला !! तुषार आहेच ना तिच्या आयुष्यात!! नाही मी नाही सांगणार तिला की मी आता इथे राहणार नाही ते !! मला तिला विसराव लागेन !!आणि ती अशीच समोर राहिली माझ्या तर मी कधीच नाही विसरू शकणार तिला !! तिच्यावर माझ प्रेम कायम असेन पण तिच्या आयुष्यात आता मी कुठेच नसेन..!! माझ्या किवितेतून फक्त तिलाच शब्द बोलतील !! पण ते तिला कधीच कळणार नाहीत !!  नाही मला तिला आता विसरावंच लागेन !!!!
समीर असंख्य विचारत हरवुन गेला होता. त्याला सायलीला विसरायचं होत...!!

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...