मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध..(कथा भाग १)

   "माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं..!! होना !! मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ??..काहीच कळतं नाही!! ही कथा माझी आहे !! माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे !! हो विश्वासाला तडा जाणारी आहे !! सांगू की नको या निर्णयावर मी होतो !! पण अखेर सांगतोच आहे !! मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं ..!!"
या कथेची सुरुवात होते ती माझ्या लग्नानंतरच्या काही दिवसापासून ..
"प्रिया ..!! आज आपण थोड बाहेर जायचं का?? " मी म्हणजे सुहास तिला विचारत होता.
"कुठे जायचं आहे !!" प्रिया सुहासकडे पाहत म्हणाली.
"विसरलीस ??"
"काय ??"
"आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे !!!" सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
"अरे !! हे बघ सुहास !! असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये !!"प्रिया रागात बोलली आणि निघून गेली.
"मला तुझं हे उत्तर माहीत होत प्रिया !! आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते !! पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस !! हे कधी तरी जाणून घे तू !!!" पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रियाकडे सुहास बघून बोलत होता. तिने सगळे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं.
"मन..!! खरतर याच काही कळतचं नाही मला. त्याच्या सारखं वागल तरी ते वाहवत घेऊन जात आणि त्याच्या विरुध्द वागल तरी ते नाराज होतं.. मग वागावं तरी कसं?? आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया..!! कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं..!! " सुहास शांत बसून कित्येक वेळ आपल्या मनातल्या विचारांशी भांडत होता. तसाच कित्येक वेळ बसून होता.
  "प्रियाशिवाय तरी कोण आहे माझ्या आयुष्यात, ही करोडोंची  संपत्ती , हा बंगला , या गाड्या मला एकट्या का वाटाव्या ..!! .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत ..!!पण झाल भलतचं काही..!! उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला..!!"
    खिडकीच्या जवळ बसून सुहास स्वतः ला हरवून जात होता, पण तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. सुहास धावत खोलीच्या बाहेर गेला. पाहतो तर प्रिया जमिनीवर कोसळली होती.
"प्रिया ...!! काय झाल हे !! "सुहास तिला उठवू लागला.
"आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहेना ..!! तो साजरा करत होते ..!! " प्रिया दारूच्या नशेत बोलत होती.
"हा असा !! प्रिया तू दारू पिऊन आली आहेस ??"
"हो..!! तुला आवडणार नाही माहितेय मला..!! पण तरी मी दारू पिऊन आले!! " धडपड करत प्रिया उठून उभा राहिली. हसत हसत खोलीत निघून गेली.
"happy anniversary !!" सुहास स्वतःकडे बाजूच्या आरशात पाहतच म्हणाला. डोळ्यातून येणारा एक अश्रू हसतच जमिनीला मिळाला. कोणाला काहीही न सांगता.
  माझ्या आणि प्रिया मध्ये कधी प्रेम झालचं नाही. मी केलं तिच्यावर पण तिने कधी केलंच नाही. आणि मनमोकळेपणाने कधी मला ती बोललीच नाही.काय सलते आहे मनात ते तरी सांगावं ना मला एकदा .. पण तेही नाही ..!!  नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती ?? समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून..!! तिच्या मनात काय चालले आहे काही कळत नाही.!!
  पण रात्रीच्या त्या अंधारात माझ्यातील पुरुष जागा होतो. आणि मला म्हणतो की काय ऐकून घेतोस तीच तू !! तू पुरुष आहेस ना !! मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला !!  या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. !! नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे !! उठ सुहास !! " पण मन वाईट आहे ..!! कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी..? काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना.!!. आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे !! अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही...!! ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले !! नाही ना !! मग तरीही तिला माझ प्रेम कळालं नाही..! खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ?? " सुहास विचारांच्या तंद्रीत होता आणि तिकडे रात्रीच्या अंधारावर किरणांनी विजय मिळवला होता.
  रात्रीच्या त्या प्रसंगात आपण खरंच चुकीचं वागलो असं बहुतेक प्रियालही वाटत होतं. ती पलंगावरून उठली आणि थेट सुहास बाहेरच्या खुर्चीत बसला होता त्याच्याकडे गेली.
"माझ जरा काल चुकलंच ..!! "पाठमोऱ्या सूहासकडे पाहून प्रिया म्हणाली.
सुहास खुर्चीवरून उठला तिच्याकडे बघत तो फक्त हसला आणि म्हणाला.
"ठीक आहे ..!! जाऊ दे !! होत असं !! बस मी तुला चहा देतो करून !!"
"नाही नको !! " प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"घे थोडा चहा !! आणि मलाही घ्यायचाच आहे थोडा !! "
"बरं !!" प्रिया होकारार्थी मान डोलवत म्हणाली.
  सुहास स्वयंपाक घरात जाऊ लागला. अचानक त्याची नजर खाली पडलेल्या एका कागदावर जाते. कुतूहलाने तो कागद सुहास उचलून घेतो आणि स्वयंपाकघरात जातो. प्रियाला आणि त्याला दोन कप चहा तो करू लागतो. चहा करण्याच्या नादात तो कागद तसाच बाजूला ठेवला जातो.
  बाहेर दोन कप चहा घेऊन येत सुहास प्रियाच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहू लागला. तिच्या जवळ येत तिला चहाचा कप देत तो म्हणाला.
"तुला हवं असेल तर तू आई बाबांकडे जाऊ शकतेस तुझ्या !!"
सुहासच्या या बोलण्याकडे आश्चर्य चकित होऊन प्रिया पाहू लागली आणि म्हणाली.
"नाही ..!! त्याची काही गरज नाहीये ..!! " एवढंच बोलून प्रिया चहाचा कप घेऊन खोलीत गेली.
   खोलीत येताच आपल्या पर्स मध्ये ती पाहू लागली. कित्येक वेळ शोध घेऊनही तिला हवं ते मिळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पाहू लागली. आणि समोर आलेल्या सुहासला पाहून शांत झाली.
सुहास ती काहीतरी शोधते आहे हे पाहून विचारू लागला.
"काही शोधते आहेस का?? "
" काही नाही!! " एवढंच म्हणून प्रिया पुन्हा खोलीत निघून गेली.
खोलीत येताच पुन्हा शोधू लागली.
"इथेच असायला हवी ती चिठ्ठी !! सापडत  नाहीये !!" शोधून शोधून थकलेली प्रिया स्वत:ला म्हणू लागली. तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढू लागली.

क्रमशः

✍© योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...