मुख्य सामग्रीवर वगळा

गणपती आरती || गणपती स्तोत्र || Ganpatichi Aarati ||


गणपतीची आरती 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥३॥



गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||



गणपतीची १०८ नावे 


1. गजानन (ॐ गजाननाय नमः।)
2.गणाध्यक्ष (ॐ गणाध्यक्षाय नमः।)
3.विघ्नराज (ॐ विघ्नाराजाय नमः।)
4. विनायक (ॐ विनायकाय नमः।)
5. द्वैमातुर (ॐ द्वैमातुराय नमः।)
6. द्विमुख (ॐ द्विमुखाय नमः।)
7. प्रमुख (ॐ प्रमुखाय नमः।)
8. सुमुख (ॐ सुमुखाय नमः।)
9. कृति (ॐ कृतिनॆ नमः।)
10. सुप्रदीप (ॐ सुप्रदीपाय नमः।)
11. सुखनिधी (ॐ सुखनिधयॆ नमः।)
12. सुराध्यक्ष (ॐ सुराध्यक्षाय नमः।)
13. सुरारिघ्न (ॐ सुरारिघ्नाय नमः।)
14. महागणपतयॆ (ॐ महागणपतयॆ नमः।)
15. मान्याय (ॐ मान्याय नमः।)
16. महाकाल (ॐ महाकालाय नमः।)
17. महाबला (ॐ महाबलाय नमः।)
18. हॆरम्ब (ॐ हॆरम्बाय नमः।)
19. लम्बजठर (ॐ लम्बजठरायै नमः।)
20. ह्रस्वग्रीव (ॐ ह्रस्व ग्रीवाय नमः।)
21. महॊदरा (ॐ महॊदराय नमः।)
22. मदॊत्कट (ॐ मदॊत्कटाय नमः।)
23. महावीर (ॐ महावीराय नमः।)
24. मन्त्रिणॆ (ॐ मन्त्रिणॆ नमः।)
25. मङ्गल स्वरा (ॐ मङ्गल स्वराय नमः।)
26. प्रमधा (ॐ प्रमधाय नमः।)
27. प्रथम (ॐ प्रथमाय नमः।)
28. प्रज्ञा (ॐ प्राज्ञाय नमः।)
29. विघ्नकर्त्र (ॐ विघ्नकर्त्रॆ नमः।)
30. विघ्नहन्त्र (ॐ विघ्नहन्त्रॆ नमः।)
31. विश्व नॆत्र (ॐ विश्व नॆत्रॆ नमः।)
32. विराट्पति (ॐ विराट्पतयॆ नमः।)
33. श्रीपति (ॐ श्रीपतयॆ नमः।)
34. वाक्पति (ॐ वाक्पतयॆ नमः।)
35. शृङ्गारिण (ॐ शृङ्गारिणॆ नमः।)
36. अश्रितवत्सल (ॐ अश्रितवत्सलाय नमः।)
37. शिवप्रिय (ॐ शिवप्रियाय नमः।)
38. शीघ्रकारिण (ॐ शीघ्रकारिणॆ नमः।)
39. शाश्वत (ॐ शाश्वताय नमः।)
40. बल (ॐ बल नमः।)
41. बलॊत्थिताय (ॐ बलॊत्थिताय नमः।)
42. भवात्मजाय (ॐ भवात्मजाय नमः।)
43. पुराण पुरुष (ॐ पुराण पुरुषाय नमः।)
44. पूष्णॆ (ॐ पूष्णॆ नमः।)
45. पुष्करॊत्षिप्त वारिणॆ (ॐ पुष्करॊत्षिप्त वारिणॆ नमः।)
46. अग्रगण्याय (ॐ अग्रगण्याय नमः।)
47. अग्रपूज्याय (ॐ अग्रपूज्याय नमः।)
48. अग्रगामिनॆ (ॐ अग्रगामिनॆ नमः।)
49. मन्त्रकृतॆ (ॐ मन्त्रकृतॆ नमः।)
50. चामीकरप्रभाय (ॐ चामीकरप्रभाय नमः।)
51. सर्वाय (ॐ सर्वाय नमः।)
52. सर्वॊपास्याय (ॐ सर्वॊपास्याय नमः।)
53. सर्व कर्त्रॆ (ॐ सर्व कर्त्रॆ नमः।)
54. सर्वनॆत्रॆ (ॐ सर्वनॆत्रॆ नमः।)
55. सर्वसिद्धिप्रदाय (ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः।)
56. सिद्धयॆ (ॐ सिद्धयॆ नमः।)
57. पञ्चहस्ताय (ॐ पञ्चहस्ताय नमः।)
58. पार्वतीनन्दनाय (ॐ पार्वतीनन्दनाय नमः।)
59. प्रभवॆ (ॐ प्रभवॆ नमः।)
60. कुमारगुरवॆ (ॐ कुमारगुरवॆ नमः।)
61. अक्षॊभ्याय (ॐ अक्षॊभ्याय नमः।)
62. कुञ्जरासुर भञ्जनाय (ॐ कुञ्जरासुर भञ्जनाय नमः।)
63. प्रमॊदाय (ॐ प्रमॊदाय नमः।)
64. मॊदकप्रियाय (ॐ मॊदकप्रियाय नमः।)
65. कान्तिमतॆ (ॐ कान्तिमतॆ नमः।)
66. धृतिमतॆ (ॐ धृतिमतॆ नमः।)
67. कामिनॆ (ॐ कामिनॆ नमः।)
68. कपित्थपनसप्रियाय (ॐ कपित्थपनसप्रियाय नमः।)
69. ब्रह्मचारिणॆ (ॐ ब्रह्मचारिणॆ नमः।)
70. ब्रह्मरूपिणॆ (ॐ ब्रह्मरूपिणॆ नमः।)
71. ब्रह्मविद्यादि दानभुवॆ (ॐ ब्रह्मविद्यादि दानभुवॆ नमः।)
72. जिष्णवॆ (ॐ जिष्णवॆ नमः।)
73. विष्णुप्रियाय (ॐ विष्णुप्रियाय नमः।)
74. भक्त जीविताय (ॐ भक्त जीविताय नमः।)
75. जितमन्मधाय (ॐ जितमन्मधाय नमः।)
76. ऐश्वर्यकारणाय (ॐ ऐश्वर्यकारणाय नमः।)
77. ज्यायसॆ (ॐ ज्यायसॆ नमः।)
78. यक्षकिन्नेर सॆविताय (ॐ यक्षकिन्नेर सॆविताय नमः।)
79. गङ्गा सुताय (ॐ गङ्गा सुताय नमः।)
80. गणाधीशाय (ॐ गणाधीशाय नमः।)
81. गम्भीर निनदाय (ॐ गम्भीर निनदाय नमः।)
82. वटवॆ (ॐ वटवॆ नमः।)
83. अभीष्टवरदाय (ॐ अभीष्टवरदाय नमः।)
84. ज्यॊतिषॆ (ॐ ज्यॊतिषॆ नमः।)
85. भक्तनिधयॆ (ॐ भक्तनिधयॆ नमः।)
86. भावगम्याय (ॐ भावगम्याय नमः।)
87. मङ्गलप्रदाय (ॐ मङ्गलप्रदाय नमः।)
88. अव्यक्ताय (ॐ अव्यक्ताय नमः।)
89. अप्राकृत पराक्रमाय (ॐ अप्राकृत पराक्रमाय नमः।)
90. सत्यधर्मिणॆ (ॐ सत्यधर्मिणॆ नमः।)
91. सखयॆ (ॐ सखयॆ नमः।)
92. सरसाम्बुनिधयॆ (ॐ सरसाम्बुनिधयॆ नमः।)
93. महॆशाय (ॐ महॆशाय नमः।)
94. दिव्याङ्गाय (ॐ दिव्याङ्गाय नमः।)
95. मणिकिङ्किणी मॆखालाय (ॐ मणिकिङ्किणी मॆखालाय नमः।)
96. समस्त दॆवता मूर्तयॆ (ॐ समस्त दॆवता मूर्तयॆ नमः।)
97. सहिष्णवॆ (ॐ सहिष्णवॆ नमः।)
98. सततॊत्थिताय (ॐ सततॊत्थिताय नमः।)
99. विघातकारिणॆ (ॐ विघातकारिणॆ नमः।)
100. विश्वग्दृशॆ (ॐ विश्वग्दृशॆ नमः।)
101. विश्वरक्षाकृतॆ (ॐ विश्वरक्षाकृतॆ नमः।)
102. कल्याणगुरवॆ (ॐ कल्याणगुरवॆ नमः।)
103. उन्मत्तवॆषाय (ॐ उन्मत्तवॆषाय नमः।)
104. अपराजितॆ (ॐ अपराजितॆ नमः।)
105. समस्त जगदाधाराय (ॐ समस्त जगदाधाराय नमः।)
106. सर्वैश्वर्यप्रदाय (ॐ सर्वैश्वर्यप्रदाय नमः।)
107. आक्रान्त चिद चित्प्रभवॆ (ॐ आक्रान्त चिद चित्प्रभवॆ नमः।)
108. श्री विघ्नॆश्वराय (ॐ श्री विघ्नॆश्वराय नमः।)

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...