मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kathan ||




भाग ५

विमानाच्या वेगाने शीतल सगळं काही मागे सोडून निघाली. पुण्यात आली. सगळं काही नव्याने तिला भेटलं. कंपनीने राहायला फ्लॅट ही दिला.
आणि आपल्या जुन्या आठवणी ,नाती सोडून ती या नव्या फ्लॅटमध्ये आली. इथे सगळं काही तिला नव्याने भेटत होत. क्षणात ती या जगात हरवून जाऊ लागली. तिकडे त्रिशा आणि समीर आपल्या छोट्याश्या जगात राहायला लागले. पण दोन्हीकडे एक रिकामी पोकळी होती. ती शीतलला जाणवत होती, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करत होती अगदी ठरवून.

"का कोणास ठाऊक !! पण राहून राहून मला त्रिशाची ओढ का लागावी हेच मला कधी कळतं नाही. मला आई व्हायचं नव्हतं तरीही मी सगळ्यांच्या आनंदासाठी आई झाले. पुढे इकडे येऊन नोकरी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी मनात नसतानाही परवानगी दिली. अगदी कोणतीही अडवणूक न करता. मग सर्व काही आज मी जे ठरवलं तसच होत असताना, काहीतरी राहून गेले अस का वाटत आहे. तो त्रिशाचा स्पर्श , तीच निरागस हास्य , ते बोलके डोळे  मला का सारखी तिची आठवण करून देतात. अस वाटत सतत सोबत असावी ती , तिच्या अल्लड प्रेमाला साद घालावी अस का वाटतंय मला ?? " शीतल कित्येक वेळ एकटीच खोलीत बसून विचार करत बसली होती.  तेवढ्यात तिच्या समोर ठेवलेला फोन वाजला. शीतलने फोन उचलला.

"हॅलो !!कोण बोलतंय ??"
"नमस्कार मॅडम, मी मेघा जोशी बोलतेय ! आपल्या ऑफिसमधून !!"
"हो बोला ! "
"मॅडम , आपल्याला जो राहायला फ्लॅट दिला आहे तिथे काही अडचण तर नाही ना ??"
"नाही काही अडचण नाही !! सर्व ठीक आहे !"
"ठीक आहे !! मग भेटुयात ऑफीस मध्ये !!"
"हो नक्की "

शीतलने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. आणि तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.

"हॅलो !!"
"हॅलो !! समीर बोलतोय !!"
"समीर !! बोल ना !! कसा आहेस ?? आई कश्या आहेत आणि त्रिशा कशी आहे !! रडतीये कारे ती ?? सांग ना ?? बोल ना !!"
"त्रिशा खूप खुश आहे शीतल आत्ताच झोपी गेली !! सारखं माझ्या आणि तुझ्या फोटोकडे पाहून नकळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती!! " 
शीतल काहीच बोलली नाही. पण नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू जणू खूप काही बोलून गेला. 
"आणि माहितेय !! आई तर सारखं मला म्हणत होती की शीतल कशी असेन ,कुठे असेन !! बघ एकदा फोन करून !!पण म्हटलं नको !! तुला उगाच त्रास होईल !!शीतल !! शीतल !! ऐकते आहेस ना??"
शीतलचे मन हे सर्व ऐकून भरून आले. ती समीरला म्हणाली,
"मी नंतर बोलते समीर तुझ्याशी !!"

शीतलने फोन ठेवताच तिच्या डोळ्यातील आलेले पाणी तिने लगेच पुसले. क्षणभर ती हरवून गेली पण पुढच्या क्षणात मनाचा निर्धार करून ती स्वतःला समजावू लागली. नात्यांच्या या जगात अशीच जर मी गुरफटून राहिले तर पुढे कधीच जाऊ शकणार नाही. समीर मला असाच भावनिक साद देईल आणि मला तिकडे बोलावून घेईन पण मी आता या सगळ्या गोष्टींना भुलनार नाही.

शीतल पुण्यात आता रमु लागली. सगळं काही आवरून ती रोज ऑफिसला जाऊ लागली. तिच्या आयुष्याला जणू एक गती मिळाली होती. ती ,तीच ऑफीस आणि त्या ऑफिसमधील तिचे सहकारी जणू एक नवं जग दिला मिळालं होत. हळूहळू ती या सगळ्या बदलाला स्वीकारू लागली होती. पण एक मन कुठेतरी तिला नकळत काहीतरी राहून जातंय याची आठवण करून देत होते. त्या ऑफिसच्या जगात ते ती नकळत शोधण्याचा प्रयत्न करत होती. 

"हॅलो मॅडम !! " 
"मेघा!! बोल काय म्हणतेय ??"
"मॅम !! उद्या आपल्या ऑफीस मध्ये छोटा कार्यक्रम आहे !!"
"कार्यक्रम ?? कसला ??"
" यामध्ये ना सगळ्या ऑफीस स्टाफने आपल्या फॅमिली सोबत यायचं !! मग इथे मस्त एन्जॉय केला जातो !! सगळ्यांच्या ओळखी होतात !! खूप धम्माल येते !!"
"नाइस !! " शीतल तुटक बोलली.तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणाक्षणाला बदलत गेले. 
" मॅम येणार ना नक्की ??" 
शीतलने फक्त होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला तेव्हा कळाल की जी मनातली रुखरुख आहे ती कशासाठी होती. आपण इथे आहोत पण आपली फॅमिली कुठे आहे ??  ती पोकळी तिला क्षणात जाणवून आली. 

फ्लॅटवर  संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला.
"समीर !! "
"शीतल !! आलीस ऑफिसमधून ?"
"हो आत्ताच आले. !!" 
शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. 
" शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??"
शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली.
" नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता."
"बरं बरं !! " 
"समीर त्रिशा कुठे आहे रे ?? मला बोलायचं आहे तिच्याशी !!" शीतल अगदिक होऊन म्हणाली.
"आहे ना माझ्या जवळच !! आज नुसता गोंधळ घातलाय तिने घरात!! रांगत रांगत सगळं घर फिरायच ठरवलंय तिने !"
"रांगते ती ?? "
"हो म्हणजे काय !! सगळ्या घरात फिरते !! आईला तर पाच मिनिट सुद्धा सोडत नाही. सारखं आज्जी आजोबा पाहिजेत तिला. "
" मोबाईल स्पीकरवर कर ना !! ती आहे ना तिथे ??"
" हो आहे ना !! बोल तू ती ऐकतेय सगळं !!"
"त्रिशा , ये बाळा !! कोण बोलतेय बघ तरी !! मी तुझी आई बोलतेय !! " 
त्रिशा शीतलचा आवाज ऐकताच फोनकडे कुतूहलाने पाहू लागली. तिला आपल्या आईचा आवाज ओळखायला एक क्षणही लागला नाही.
"मला मिस करतेस ना बाळा !! " 
त्रिशा आता शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या त्या बारीक ओठातून जणू शब्द बाहेरच येत नव्हते. ती सतत त्या फोनमध्ये पाहत होती आपल्या आईला शोधत होती.
"समीर !! ती ऐकतेय ना रे ??"
"हो शीतल !!! ती तुला ऐकतेय !! तिच्या मनाची तुला पाहण्याची ओढही मला जाणवते आहे !! तुला माहितेय शीतल तिला बोलता येत नाही अजून पण तीच मन मला लगेच कळतं. तुला ती खूप मिस करते पण कधी तुझ्याकडे येण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत नाही. खूप हुशार आहे त्रिशा आपली. " समीर शीतलला सगळं मनमोकळे पणाने सांगू लागला.
शीतलला अश्रू अनावर झाले.तिने फोन कट केला. 

शीतल कित्येक वेळ त्रिशाच्या आठवणीत हरवून गेली. तिच्या मनाला त्रिशाला पाहण्याची जणू ओढ लागली.

क्रमशः

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...