मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||



भाग ८ 

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती.
"समीर !!" 
आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला.
"आई ??"
"हो !! मीच बोलते आहे !! कुठे आहेस तू ? अरे लवकर घरी ये !!"
" काय झाल आई ?? आणि एवढी घाबरल्या सारखी बोलतेस तू !! काय झालंय ??"
"अरे त्रिशा !!" 
" काय झालं त्रिशाला आई !!"
" अरे ती बेशुद्ध पडली आहे !!  खेळता खेळता अचानक जागेवर पडली !! मी आणि बाबा शेजारच्या दवाखान्यात जातोय तू तिकडेच ये पटकन !!"
"काय ?? कस काय पडली ती बेशुद्ध !!! काय झालंय आई ??"
" हे बघ जास्त विचारत बसू नकोस तू ये पटकन !!" आई घाबरल्या स्वरात समीरला बोलत होती.

आईचा फोन ठेवताच समीर लगेच आपल्या जागेवरून उठला . त्याला काहीच सुचत नव्हतं. समोर कोणी आहे याचं भानही त्याला राहील नाही. 
" अरे समीर !! व्हॉट हॅपन ?? " 
समीरचा बॉस अचानक धावत निघालेल्या समीरला विचारतो.
"सॉरी बॉस !! मुलगी आजारी आहे !! आय हॅव टू गो !!" 
" अरे हो पण !! झालंय तरी काय !!"
" मलाही नीटसं अस माहीत नाही !! मी उद्या आल्यावर सांगेन ना !!"
"ओके !! जा !! तुझी तिकडे जास्त गरज आहे !!"
"थॅन्क्स !! "

समीर ऑफिस मधून धावत पळत निघाला. त्याला आजूबाजूला काय चाललंय याचही भान राहिलं नाही. रस्त्यात त्याची गाडी सुसाट निघाली. त्याला त्यावेळी आपल्यापेक्षा आपल्या मुलीची जास्त काळजी वाटू लागली. इकडे शीतलला याची काही माहिती नव्हती.

"माझी लाडकी लेक त्रिशा !! काय झालं असेल तिला?? ती अशी कशी बेशुद्ध पडली !! काहीच कळत नाहीये !! तिला काही झालं तर मी काय करायचं !! आई बाबा यांना काय म्हणून मी समजवायच !! देव करो आणि सगळं काही ठीक असो !! माझ्या त्रिशावर देवाची कृपा आहे आणि ती राहिलंच !! तिला काही होणार नाही !! " 
समीर दवाखान्यात आला. समोर आई बाबा आणि त्यांच्या खांद्यावर असलेली त्रिशा पाहून त्याला काय बोलावं काहीच सुचलं नाही. 

"बाबा !! काय म्हणाले डॉक्टर ??"
"काही नाही समीर आता काळजी करण्यासारखं काही नाही एवढच म्हणाले..!! तरीही एकदा तू त्यांना भेटून ये !!"
"ठीक आहे बाबा !!"
समीर समोरच असलेल्या डॉक्टरांच्या केबीनकडे  गेला,
"डॉक्टर !!"
"या !! बसा ना !! "
"थँक्यू डॉक्टर ! मी समीर दिक्षित !! त्रिशाचा वडील !!"
"ओके !! "
"डॉक्टर काय झालंय त्रिशाला !! म्हणजे ती अशी अचानक बेशुद्ध का पडली !!??"
" समीर त्रिशाला आजार असा काही नाही झाला !! पण तिला म्हणावा असा पोषक आहार होत नाहीये !! त्यामुळे तिला अशक्तपणा आलाय !! तिची आई वेळेवर दूध पाजते ना तिला ??"
"डॉक्टर !! अक्च्युल्ली तिची आई नसते इथे !! कामानिमित्त बाहेर गावी असते !! त्यामुळे आईच दूध तिला मिळतच नाही !!"
"ओके !! ठीक आहे !! मग दुसरे कोणतेही दूध दिले तरी चालेल !! आणि तिला काही गोळ्या लिहून देतोय त्या सकाळ संध्याकाळ देत राहा !! म्हणजे ती एकदम ठणठणीत बरी होईल !! "
"ठीक आहे डॉक्टर !! "

समीर डॉक्टरांना भेटून बाहेर आला. डॉक्टर काय म्हणाले हे आई बाबांना सांगितल्या नंतर ते त्रिशाला घेऊन घरी गेले. समीर तिच्या जवळच बसून होता. त्रिशा घरी येताच शांत झोपी गेली. समीर कित्येक वेळ तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या जवळ येत बाबा म्हणाले,
"काही नाही झालं त्रिशाला समीर !! " 
"चल उठ आता !! आणि फ्रेश हो!!"
"हो बाबा !! "

समीर फ्रेश व्हायला गेला. इकडे शीतल तिचे प्रेझेंटेशन अगदी सुंदर मांडत होती. तिच्या या प्रेझेंटेशनने समोरचे सगळे अगदी खुश झाले.

"अप्रतिम शीतल !! माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान केलंस तू प्रेझेंटेशन !!" शीतलची बॉस शीतलला म्हणाली.
"थँक्यू मॅम !!"

शीतलला ऑफिसच्या कामात केव्हा संध्याकाळ झाली हे कळाल सुद्धा नाही. ती घड्याळाकडे पाहत शेजारीच बसलेल्या मेघाल म्हणाली.
"आज दिवस कसा गेला कळाल नाही !! मी निघते आहे मेघा !! तेवढं तू बाकीचं सगळं करून घेशील ना !! "
"नो प्रोब्लेम मॅम !! तुम्ही निघा !! मी करते हे सगळं !!"
"थॅन्क्स !!"

शीतल सगळं आवरून फ्लॅटवर यायला निघाली. तिला आज जे घडलं ते सगळं कधी एकदा समीरला सांगेन अस झाल होत. ती अगदी धावत पळत घरी आली. हातातली बॅग बाजूला ठेवून ती समीरला फोन लावते, 

एक दोन वेळा फोन वाजून बंद झाला,
"हा समीर फोन का उचलत नाहीये ??"
पुन्हा ती फोन लावते, आणि समीर फोन उचलतो,
"समीर !! अरे कुठे होतास तू !! कितीवेळा फोन लावत होते मी !! उचलत का नव्हतास ??"
"मी फ्रेश व्हायला गेलो होतो !! "
"इतक्या लवकर !! तू घरी आहेस ??"
"हो !! "
" बरं ऐक ना !! आज माझं प्रेझेंटेशन एवढं आवडलं त्यांना !! आज माझा दिवस खूप मस्त गेला!! सगळ्यांनी माझं नुसतं तोंडभरून कौतुक केलं !!"
"अरे व्हा !! गुड !! " 
"हो ना !! आज एवढं भारी वाटतंय ना !! इकडे आल्यापासून मला माझ्या मनासारखं अस काही वाटतच नव्हतं !! पण आज वाटतंय !! "
"छान !!"  समीर थोड तुटक बोलला.
कित्येक वेळ शीतल समीरला आज काय झालं हे सांगत राहिली. समीर फक्त ऐकत राहिला.
"बरं तू ऑफिसमधून लवकर का आलास घरी ??"
शीतलने असे विचारताच समीर क्षणभर शांत राहिला, 
"काही नाही असच !! " 
समीरच्या बोलण्यातला रुक्षपणा शीतलला जाणवल्यावाचून राहिला नाही, काहीतरी झालंय हे तिला लक्षात आलं, 
" काय झालंय समीर ?? सांगशील का ??"
" आज तुझा मूड खूप चांगला आहे शीतल !! आज राहूदे ना !! उद्या बोलू आपण !!" 
" समीर !! काय झालंय ?? आणि त्रिशा कुठे आहे ??"
" झोपली आहे त्रिशा !! औषध दिलं आईने तिला आल्यावर आणि ती झोपली !!"
"औषध ?? कसलं ??"
" आज त्रिशा खेळता खेळता अचानक बेशुद्ध होऊन पडली होती!!" 
"काय ?? काय झालं त्रिशाला समीर !! मला आत्ताच्या आत्ता तिचा आवाज ऐकायचा आहे !! "
"शीतल !! शीतल !! शांत हो !! "
"काय शांत होऊ मी समीर !! आणि तुला साधा एक फोनही करावासा वाटला नाही मला !! मी तिची आई आहे समीर !!"
शीतलच्या डोळ्यात पाणी आले, ती काय बोलत आहे हेही तिला कळत नव्हतं, क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून त्रिशाच्या कित्येक आठवणी येऊन गेल्या,
" डॉक्टर म्हणाले अशक्तपणा आहे !! होईल ती नीट !! शीतल तू तुझ्या कामात लक्ष दे !! आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला !! "
"समीर मी येतेय तिकडे !! "
"शीतल !! ऐक माझं !! एवढं काही झालं नाहीये !!"
" नाही समीर !! मी येतेय तिकडे !! "
" ऑफिस काम , अस सोडून नाही येता येणार शीतल तुला !! "
"ते काही मला माहित नाही !! मी येतेय समीर , मला नाही चैन पडणार इकडे !! "

शीतल फोन ठेवते तिला क्षणभर सगळं जागेवर थांबून गेल्यासारखं वाटतं होत, त्या घाईगडबडीत ती आपली बॅग भरायला घेते, त्यावेळी तिच्या मनात दुसर काहीच येतं नव्हतं. कधी एकदा तिला त्रिशाला भेटेन अस झाल होत. 

शीतल सगळं क्षणात सोडून आपल्या घराकडे निघाली होती आपल्या बाळासाठी, आपल्या त्रिशासाठी,

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...