मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग १० || Story || Marathi ||




भाग १०

कित्येक वेळ शीतल आणि समीर बोलत बसले. त्रिशाने शीतलला ओळखलं नाही याचं दुःख वाटत होत. ती पुन्हा पुन्हा त्रिशाकडे जाण्याचा हट्ट करत होती. पण समीर तिला थांबवत होता. तेवढ्यात आई त्रिशाला घेऊन आली. समोर तिला पाहून शीतल तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली 
"मी तुझी आई आहे बाळा !! येना माझ्याकडे !! " शीतल आपले डोळे पुसत म्हणाली. 
"जा बाळा !! आपल्या आईकडे जा !! " आई त्रिशाकडे पाहून म्हणाली. 

त्रिशाने क्षणभर शीतलकडे पाहिलं ती अलगद तिच्याकडे गेली. शीतलला याचा आनंद झाला. पुन्हा कित्येक वेळ ती तिच्यासोबत खेळत राहिली. मध्येच ती तिला आपल्या मिठीत घेत होती. समीर आणि आई लांबुनच कित्येक वेळ हे पाहत होते. तेवढ्यात समीरच्या बाजूला ठेवलेला फोन वाजला. समीर फोन उचलताच समोरून कोणी स्त्री बोलत होती,

"हॅलो !! दीक्षितांचा नंबर आहे ना हा ??"
" हो !! आपण ??"
"नमस्कार , मी मेघा जोशी बोलते आहे ! शीतल मॅमच्या ऑफिस मधून !!"
"ओके !! एक मिनिट हा !! त्यांना देतो मी फोन !!"
समीरने फोन बाजूला ठेवला. समोर त्रिशा सोबत खेळत असलेल्या शीतलला त्याने हाक मारली. तिच्या ऑफिसमधून फोन आल्याचं तिला सांगितलं. शीतलने फोन घेतला.

"हॅलो !! हा मेघा बोल ना !!"
"मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
"अग हो हो !! मेघा ॲक्च्युली मी थोड्या वेळाने ऑफीसमध्ये फोन करणारच होते की आज मी येणारच नाही म्हणून !! माझ्या मुलीची अचानक तब्येत बिघडली म्हणून रात्रितूनच मला इकडे यावं लागलं !!"
"ओके !! मॅम मग काल रात्री तरी मला सांगायचं !! एक फोन केला असता तरी चाललं असतं !!"
"नाही ग !! खूप उशीर झाला होता म्हणून नाही केला मी फोन !! "
"बरं ठीक आहे !! तुम्ही घ्या काळजी !! तुमचा निरोप मी बॉसना कळवते !! त्याही सकाळपासून मला विचारतं होत्या अचानक कुठे गेल्या तुम्ही म्हणून !! "
" नक्की सांग त्यांना !! आणि माझ्याकडून त्यांना सॉरी पण सांग !! मी अशी न काही कळवता आले त्यांना वेगळंच काही वाटेनं पुन्हा !! "
"डोन्ट वरी मॅम !! त्या सहसा फॅमिली प्रोब्लेम असेल तर काही म्हणत नाहीत !! मी सांगते त्यांना !!"
"थॅन्क्स मेघा !! "

शीतल आणि मेघाच बोलणं झाल्यावर शीतल थोडा वेळ आपल्याच विचारात गुंग होते. हे पाहताच समीर तिच्या जवळ येतो,
"काय झालं शीतल ?? काही प्रोब्लेम तर नाही ना ??"
" नाही समीर !! प्रोब्लेम अस म्हणता येणार नाही !! पण उद्या परवा मला पुन्हा ऑफिसला जाव लागेल !! म्हणजे पुन्हा त्रिशापासून दूर जावं लागेल !! "
"तेव्हाच तेव्हा पाहुयात ना !! आतातरी मस्त वेळ घालव तिच्यासोबत !! ती बघ तुझ्याकडे कशी पाहते आहे ती !!"
समीर मिश्किल हसत म्हणाला. शीतलही गालातल्या गालात हसली. त्रिशाकडे धावत गेली. कित्येक वेळ तिच्यासोबत खेळत बसली. समीर एकटक त्या दोघींकडे पाहत राहिला,

"शीतल आणि त्रिशा या दोघी जणू माझ्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत, आई बाबां नंतर माझ्या आयुष्यात माझं अस म्हणावं जिथं हक्कान मी माझं सर्वस्व अर्पण कराव अस एक अढळ स्थान म्हणजे या दोघी. ज्यांच्यासाठी घाम गाळावा, अहोरात्र कष्ट करावे, जगातलं हवं ते सुख यांच्या पायी आणून ठेवावं असच मला वाटतं. शीतलने जेव्हा पहिल्यांदा मला ती आई होणार आहे हे सांगितलं !! तेव्हा जेव्हढा आनंद झाला होता त्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होतोय त्या दोघींना हसत खेळत पाहताना. एका सुखी संसारात अजून ते दुसर काय हवं होत.  पहिल्यांदा जेव्हा शीतल मुल नको अस म्हणाली होती तेव्हा पुढे काय?? हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. पण आज त्या सर्व प्रश्नांची जणू उत्तरेच मला मिळाली आहेत. " समीर शीतल आणि त्रिशाकडे पाहून हसला. त्याच्या मनात विचारांचं तेव्हा द्वंद्व सुरू होत.

समीर ,शीतल ,आई आणि बाबा चौघेही रात्री एकत्र जेवायला बसतात. तेव्हा शीतल आपल्या ऑफिसमधील कित्येक गप्पा गोष्टी सांगते. सगळं घर आनंदाने बहरून जात. त्यात त्रिशाचा किलबिलाट वेगळच वातावरण निर्माण करत होते.
तेवढ्यात बाबा शीतलला बोलतात,
"शीतल ,पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू ?? तुलाही ऑफिस आहेच ना उद्या !! मग कधी निघणार आहेस ??"
"बाबा !! मला वाटतं मी नाही जात ऑफिसला !! "
"काय ??" समीर अचानक बोलतो. 
"हो !! "
"पण का ??" मध्येच आई बोलते.
"कारण मला नाही राहता येणारं तुमच्या सगळ्यांपासून लांब !!"
"हो पण !! ऑफिस सोडण हा पर्याय नाही शीतल !!" बाबा शीतलकडे पाहत बोलतात.
शीतल क्षणभर शांत बसते. तिच्या मनातले बाबा ओळखतात आणि पुन्हा बोलतात.
"मला सांग शीतल !! तुला तुझं करिअर पुढे करायचं आहे ना ??"
"हो बाबा !! "
"पण घर, संसार, आपली माणसं सोडवत नाहीत तुला !! बरोबर ना ??"
शीतल होकारार्थी मान हलवते.
"मग आपण त्यावर पर्याय शोधुयात !! असंही तो मी शोधला आहेच !! यापूर्वीही मी हे तुझ्या सासूबाईंशी बोललो आहे त्यांचा होकारही आहे !! "
"कोणता उपाय बाबा ??" समीर मध्येच बोलतो.
"समीरची आई , त्रिशा आणि शीतल यापुढे पुण्यात राहतील. मी आणि समीर इथेच राहू, समीरलाही अगदीच एकटं वाटू नये म्हणून मी त्याच्या सोबत असेल. सुट्ट्यात कधी ते इकडे येतील ,कधी आम्ही तिकडे येऊ !! बोला आहे मंजूर ??"
समीर ,शीतल क्षणभर एकमेकांकडे पाहू लागतात. आणि समीर बोलतो
"हो बाबा !! आहे मंजूर !! "
"शीतल ??"
"पण बाबा , माझ्यामुळे तुम्ही आणि आई वेगळे का रहाल ??"
"जसं तू आणि समीर त्रिशासाठी राहणार तसच !!"
"हे बघ शीतल , समीर लहान होता तेव्हा माझीही ट्रान्स्फर वेगळवेगळ्या गावी व्हायची !! इथे माझे आई बाबा आणि ही तिघेच राहायचे !! समीरच्या शिक्षणासाठी प्रत्येक वेळी शहर बदलून पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा पर्याय योग्य नव्हता. मग मीच महिन्यातून एकदा दोनदा ये जा करायचो !! पण त्यामुळे माझ्यात आणि हीच्यात कधी दुरावा नाही आला. उलट अजून प्रेम घट्ट होत गेलं !! "
"बाबा खरंच तुमचं हे सगळं ऐकून मला आता मी किती चूक केली हे कळून येत आहे !!"
"चूक नाही म्हणता येणार शीतल !! पण बोलण्याने मार्ग भेटतात !! तू कधी माझ्याशी याविषयी चर्चाच केली नाहीस !! आणि तुमच्या दोघांच्या मध्ये बोलणं मला योग्य वाटलं नाही !!"
"बाबा पण तुम्ही हक्काने सांगायचं होत आम्हाला !!आम्ही आपल्या शब्दाच्या बाहेर आहोत का ?" समीर मध्येच बोलला.
" हो बाबा !! तुम्ही म्हणाल तसेच होईल !! " शीतल म्हणाली.
" मग आता मी म्हणतो तसेच करा !! यामध्ये मला काय वाटतं !! तुझ्या आईला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये !! तुमच्या दोघांच करिअर महत्त्वाचं आहे !! आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी आईने आपला जॉब , करिअर का सोडावं ?? मीही याच्या विरोधात आहे !! स्त्रीलाही तितकाच अधिकार आहे आपलं आयुष्य घडवण्याचा !! "
शीतलला बाबांचं बोलणं ऐकून काय बोलावं हेच कळत नव्हतं. लग्न, मुल ,संसार यामध्ये गुरफटून गेल की आयुष्यात स्त्रीने काहीतरी करावं हा विचारच सहसा ती विसरून जाते. पण स्वतः बाबा तिला भरारी घेण्यासाठी प्रेरित करत होते. 
"उद्या सर्व आवरा आवर करा आणि पर्वा पुण्याला निघा !! "
"ठीक आहे बाबा !!"

बाबांच्या या निर्णयाने शीतल खूप खुश झाली. तिने मेघाला लगेच फोन करून परवा येत असल्याचे कळवले, समीरही बाबांच्या विचारांनी प्रभावित झाला. जेवण केल्या नंतर शीतल आणि समीर दोघेही खोलीत आले. कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले. 

समीर आणि शीतल एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले.

क्रमशः 

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...