मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||



भाग ३

बदल

बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली ,
"आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??"
"आई !! काहीही काय ? "
" मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"

आकाश काही न बोलताच खोलीत निघून गेला. आई पुढे काहीच बोलली नाही. तिच्या मनात सतत एकच गोष्ट येत होती. आपण आकाशला मोबाईल देऊन खरंच चूक तर नाहीना केली ?? पण पुन्हा ती आपल्या मनाला समजावून सांगत होती. की नाही साधना मोबाईल ही काळाची गरज आहे . आज जर मी आकाशला यापासून दूर ठेवलं तर तो कदाचित या जगापासून दूर जाईल नको साधना उगाच विचार करू नकोस . काहीही होत नाही. 
तेवढ्यात खोलीतून आकाशचा मोठ्याने आवाज आला. साधना आकाशची आई धावत खोलीकडे गेली, पाहते तर आकाश मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात मग्न आपण जिंकलो याचा आनंद त्याला इतका झाला की त्याला तो लपवताच आला नाही. तो मोठ्याने ओरडत होता. चित्रविचित्र हावभाव करत होता. 
अचानक मोबाईलची रिंग वाजते आकाश पटकन फोन उचलतो. पलीकडून दीपक त्याचा मित्र बोलत होता.
"हॅलो , आकाश दिप्या बोलतोय !! "
"बोल ना दिप्या !! का फोन केला !! आन केला ते केला चुकीच्या पॉईंटला केला. "
"का रे भाई !! बिझी होता का कुठ !!" दिप्या मिश्किल हसत म्हणाला. 
"तुझ्या दोस्तान २६ लेव्हल पूर्ण केली ना भाऊ !!"
"काय म्हणतो !! खरंच ??"
"हा मग !! रात्रभर खेळून पूर्ण केली !! "
"लकी आहेस !! नाहीतर इथ आम्हाला दोन मिनट सुद्धा फोनला बाबा हात लावू देत नाहीत !!"
"आता काय लहान आहेस का रे दिप्या तू?? आपला आपला वेगळा मोबाईल पाहिजे आता !! "
"तुझं बरंय रे !! तुझ्या बाबांनी तुला गिफ्ट केलाय !! इथ समोरून घेऊन द्या म्हटलं तर बघू नंतर म्हणाले."
"बरं ते जाऊ दे !! फोन का केला ते सांग आता !!"
हे सगळं बाहेरून पाहणारी आई आकाशला आपल्याच जगात हरवून जाताना पाहत होती. तिला त्याच्या भोवती एका वेगळ्याच जगाची जाणीव व्हायला लागली होती. ती तिथून बाजूला आली. आणि आपल्या कामाला लागली. आकाश आणि दिपकच बोलणं चालूच होत. 
"आज भेटायचं ठरलंय सात वाजता लक्षात आहे ना ??"
"अरे भाई !! बरं झालं आठवण करून दिलीस !! पटकन मोबाईल मध्ये रिमाईंडर सेट करून ठेवतो. "
"सकाळी सहाच्या क्लासला आलार्म न लावता लवकर उठणारे साहेब आता रीमाइंडर लावणार !! छान !!"
"गप रे दिप्या !! येतो मी नक्की !! आणि बाकीच्यांना पण सांग वेळेवर यायला. "
"हो रे ! नक्की !! बरं ठेवतो आता फोन !!"
"ओके !!"

आकाश मोबाईल मध्ये रिमाइंडर सेट करतो. आणि पुन्हा मोबाईल मध्ये मग्न होतो. जो आकाश प्रत्येक आपलं काम वेळेवर पूर्ण करत होता. त्याला आता वेळेचं भान राहावं म्हणून रिमाइंडर ची गरज जाणवू लागली होती. त्याच्या गरजा आता बदलू लागल्या होत्या. ज्या जगात तो आता वावरत होता तिथे सगळंच आभासी होत. तो त्या आभासी जगातच वावरत होता, फिरत होता, बोलत होता व्यक्त होत होता आणि लोकांशी भेटतही होता, गेम्स च्या जगात कधी जिंकत होता, कधी पराभव पत्करावा लागत होता, तर कधी त्यामुळे अचानक हसत ,तर कधी उदास होत होता. जणू त्या वर्तुळात त्याला सगळं जग मिळालं होत. आणि त्या जगातूनच त्याला संध्याकाळी मित्रांना भेटण्याची आठवण करून देत होता तो त्याचा मोबाईल.

आकाश पटपट सगळं आवरून निघाला. आईकडे पाहून म्हणाला,
"आई सगळे मित्र आज भेटणार आहोत तिकडेच जातोय !! यायला थोडा उशीर होईल !!"
"उगाच उशीर करू नकोस !! लवकर ये !! आणि तो हेडफोन लावून नको जाऊस !! त्यामुळे काही ऐकू येत नाही बाहेरच !! आजूबाजूला कोणतं वाहन येतजात काही कळतं नाही त्यामुळे !! "
"आई कुठल्या जगात वावरते आहेस तू !! हल्ली हे सगळं कॉमन आहे !! आणि समज मी बसमध्ये गर्दीत आहे आणि अचानक तुझा कॉल आला तर कसा उचलायचा ??"
आई निरुत्तरीत राहिली. तिला पुढे काय बोलावं तेच कळलं नाही. मात्र तिच्या मनात एक प्रश्न मात्र निर्माण करून गेला की हेडफोन खरतर मानवाला चांगले की वाईट ?? पण याची उत्तर तिच्या मनात निरुत्तरीत राहिली. मात्र आकाशला बाहेर जाताना पाहून तिच्या मनात असंख्य विचार येऊन गेले. 

"कालपरवा पर्यंत कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मला विचारणारा आकाश आता किती बदलून गेला आहे नाही , मुल मोठी होतात पण ते क्षणात बदलतात त्याचा अनुभव आज मला येतोय. आई वहिला कोणतं कव्हर लावू?, आज कोणता शर्ट घालू ?, आई मी बाहेर मित्रात खेळायला जाऊ? म्हणून विचारणारा आकाश आता मोठा झाला नाही!! आता तो कॉलेजला जाईल नव्या जगाची त्याला ओळख होईल, पण या जगात आकाश मला ओळखेन का ?? की विसरून जाईल मला , की आम्ही आता जुन्या विचारांचे झालो म्हणून. काही काही कळत नाही.  आम्हीही तरुणाईच्या जगात असेच काहीसे पाऊल ठेवले , पण जग आता बदलून गेले आहे चिंता फक्त याचीच वाटते. बाकी माझा आकाश हुशार आहे तो नक्कीच याची काळजी घेईल. " आई कित्येक वेळ तिथेच उभा राहून आकाशच्या विचारात हरवून गेली होती. 

नव्या जगात मात्र आकाश बेधुंद होऊन फिरत होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला खूप काही खुणावत होते. आकाश पंख पसरून आभाळाकडे पाहत होता,

क्रमशः

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...