मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग ४ || मराठी रंजक गोष्टी ||




भाग ४ 

पंख

पंख पसरून तारुण्याकडे पाहताना सगळं कसं नकळत भेटत जात, त्याच कुतूहल वाटायला लागतं. आपण आता मुक्त आहोत सारं जग आपल्या हाती आहे हा आविर्भाव मनात यायला लागतो. आणि तसच काहीस आकाशला वाटू लागलं होत. सगळं अगदी सहज सोप असतं आणि जीवन याचंच नाव असतं अस त्याला वाटू लागलं , आकाश थोड्या वेळाने दिपक आणि इतर मित्रांना भेटायला त्यांच्या नेहमीच्या जागेवर आला. त्याच्या आधीच तिथे त्याचे मित्र येऊन थांबले होते. आकाशला पाहून आनंदाने दीपक बोलू लागला. 

"भाई !! लवकर आला तू !! " दीपक त्याला मिठी मारत म्हणाला. 
"निघायला उशीर झाला रे !! आणि त्यातून ही ट्रॅफिक ! वैताग आणलाय नुसता !!"
"का भाई मोबाईलने रीमाइंडर दिलं नाही का काय नीट ??" दीपक इतर मित्रांकडे हसत बघून म्हणाला आणि पुन्हा आकाशकडे पाहू लागला. 
"दिप्या मोबाईल बद्दल तर बोलूच नको!! बाबांनी काय भारी मोबाईल गिफ्ट केलाय विचारू नको !! "
"दाखवशील तर कळेल ना !!" 
"हा बघ ना !! " आकाश दिपकच्या हातात मोबाईल देत म्हणाला. 
दीपक मोबाईल बघण्यात गुंग झाला. आकाश इतर मित्रांना बोलू लागला.
"सुश्या !! मग काय म्हणतेय सुट्टी ??" 
"एक नंबर चालू आहे !! कालच वन डे ट्रीपला जाऊन आलोय !! फुल्ल एन्जॉय !! "
"क्या बात है !!! बरं काही खायला मागवल आहेत की असच बसायचं आहे ?"
"मागवा ना मग !! आजची पार्टी आकाशकडून  !! मोबाईलची पार्टी !!" दीपक हसत म्हणाला. 
"नक्की नक्की !! बिनधास्त !! काय मागवायच ते मागवा !! तुमचा भाऊ आज एकदम खुश आहे !!" आकाश सगळ्यांकडे पाहत म्हणाला. 

सगळे खूप दिवसांनी भेटल्यामुळे आनंदून गेले. शाळेत असताना दररोज भेटणारे  मित्र आता वेळ ठरवून भेटायला येवू लागले. कित्येक वेळ तिथे बसून मजा मस्ती , टिंगलटवाळी करू लागले. कोण कुठे जाणार ,कुठल्या कॉलेजात प्रवेश घेणार याबद्दल चर्चा करू लागले. 
"माझं तर ठरलं आहे बघ !! मी तर एम. बी. बी एस करणार  !! अजून आई बाबांना बोललो नाहीये पणं आता बारावीला बायोलॉजी घेणार !! "
"तुझं काय रे आकाश !! तू हुशार आहेस घेशील प्रवेश बायोलॉजीला !! आम्हाला इथ कॉमर्स जरी मिळालं तरी आनंदाने वेड लागलं !! "
"कोणी कुठेही प्रवेश घेऊ देत !! भेटायचं मात्र इथेच आपण सगळे !! अगदी दरवर्षी !! "सुश्या मध्येच बोलू लागला. 
"नक्की !! भाई काहीही झालं तरी भेटत राहु !! " आकाश सुश्याकडे पाहत म्हणाला. 

कित्येक वेळ गप्पा मारून झाल्यावर सगळे मित्र आपापल्या घरी जायला निघाले. आकाश सुध्दा निघणार तेवढ्यात दिपकने त्याला थांबून घेतलं. 
"थांबणा जरा !! जाऊ आपण दोघेनंतर !! उशीर झाला तर काकूंना माझ्याकडे होतास म्हणून सांग !!"
"दिप्या नको रे !! आधीच आई रागावली आहे माझ्यावर !!"
"थांब रे !! बोलायचं आहे तुझ्याशी थोड !! ये सुश्या , पम्या तुम्ही निघा !! आम्ही जातो दोघे !!

बाकीचे सगळे मित्र निघून गेल्यावर आकाश आणि दीपक दोघेच तिथे राहिले. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले.
"साल्या सायली भेटली होती काल मला !! "
"काल ?? काय म्हणाली रे !! " 
"तुझी आठवण काढत होती !! आकाश कुठे आहे !! कसा आहे !! हे ते ! काय नी काय !!"
"काहीही !! " आकाश गालातल्या गालात हसत म्हणाला.
"भाई लिहून घे तीच नक्की प्रेम आहे तुझ्यावर !! परवा कार्यक्रमात तुझा सत्कार झाला तेव्हा सगळ्यात जास्त तिनेच टाळ्या वाजवल्या होत्या माहितेय का ??" दीपक मिश्किल हसत म्हणाला. 
"काहीही !! " बरं सोड जाऊदे मी निघतो आता !! "
"गेम खेळायच्या असतील ना मोबाईलवर ??" 
"सध्या आपल्याला काय काम !! आहे निवांत तर मस्त एन्जॉय करून घेतो!!"
"काय लहान पोरांसारख गेम खेळत बसतो !! भाई मोबाईलवर अजून भरपूर काय काय आहे !! "
"हा माहितेय मला!"
"काय माहिती ??" दीपक प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला. 
"सगळं !!"
"व्हिडिओ बघतो का नाही !! भारीवाले??"
"कसले व्हिडिओ !!" आकाश गोंधळून गेला. त्याला दीपकच बोलणंच कळेना.
"अरे !! सगळं काय सांगावं लागत का !!  माझ्या पेनड्राईव मध्ये ४ जिबी आहे !! फुल्ल हॉट मसाला !!"
"दिप्या कधीपासून हे बघायला तू ??" आकाशला त्याच्या बोलण्याच आश्चर्य वाटलं. तो काय बोलतोय हे कळाल.
"भाई मोठा झाला ना तू ?? का अजून शाळेतच आहेस ??"
"हा पण ते घान व्हिडिओ काय बघायचे !! कोणाला कळलं तर !!"
"इथ आमच्याकड मोबाइल नाही तरी आम्ही कुठ ना कुठ जुगाड लावतो !! आणि तुमच्याकडे सगळा दुष्काळच !! गेमा खेळ तू !! " दीपक आकाशच्या हातातील मोबाईल घेत म्हणाला. 
"आता मोबाईल कशाला घेतला !! जाऊ दे रे ! !! दिप्या आपण यावर बोलू नंतर !! "
"कलंक आहेस रे मैत्रीला !! आकाश तू कलंक आहेस !! इथ मित्र आतुर झालाय व्हिडिओ बघायला आणि तुला घरी जायचंय !!"

त्यानंतर दीपक आकाशच्या मोबाईलवर कित्येक वेळ ते व्हिडिओज आणि फोटो पाहत बसला. आकाशही आता त्याला साथ देवू लागला. आकाश आता त्याच्या भोवती नकळत तयार होऊ लागलेल्या वर्तुळात अडकत जाऊ लागला. तारुण्याच्या उंबरठयावर शरीरातल्या होणाऱ्या बदलला आकाशने आता ओळखल होत. 

कित्येक वेळ दीपक सोबत गप्पा मारल्यानंतर रात्री आकाश उशिरा घरी आला. आई आणि बाबा त्याची जेवणासाठी वाटच पाहत होते. आकाशला पाहिल्यानंतर बाबा त्याच्या जवळ जात म्हणाले. 
"आज काय मग मित्रांसोबत मज्जा मस्ती का ??"
"हो बाबा !! आज सगळे भेटायचं ठरलं होत !! "
"वाजलेत किती याच भान आहेना तुला ??" आई मध्येच म्हणाली . तिचा रागावलेला स्वर आकाशला लगेच लक्षात आला आणि तो म्हणाला. 
"मी काही आता क्कुक्कुल बाळ नाहीये आई !! झाला थोडा उशीर त्यात काय एवढं !!"
"आकाश नीट बोल ! आईशी बोलतोयस याच भान ठेव !!"
"साधना !! जाऊदे झाला एखाद दिवशी उशीर !! चल आकाश फ्रेश होवून ये आणि जेवायला बस !! "
"बाबा आज बाहेरच जेवण करून आलोय त्यामुळे भूक नाहीये !! "
"थोड तरी जेव आणि मग झोप !!" 

बाबांनी सांगताच आकाश त्यांच्यासोबत जेवायला बसला. थोडावेळ गप्पा मारत बसला. आणि नंतर आपल्या खोलीत येऊन झोपायची तयारी करू लागला. 
बेडवर पडून तो कित्येक वेळ गेम खेळत बसला. नंतर वैतागून गेला. आणि अचानक त्याच्या डोक्यात दिपकचे शब्द घुमू लागले. नकळत तो पुन्हा व्हिडिओ पाहण्याकडे ओढला जाऊ लागला. 

नकळत आकाश इंटरनेटच्या जगात स्वतःला हरवू लागला. 
"एकच नंबर आहे रे हा व्हिडिओ !! काय दिसते आहे ती !!" आकाश असे कित्येक शब्द बोलू लागला जे यापूर्वी त्याने कधी ऐकले सुध्दा नव्हते. 
आणि अचानक त्याच्या शरीरात एक वीज चमकून गेली. त्याच्या शरीरात त्याला संभोग करण्याची भूक जाणवू लागली. तो कित्येक वेळ ते व्हिडिओ पाहू लागला. स्वतःला त्यात पाहू लागला. आकाशला शरिरसुखाची ओढ जाणवू लागली.

रात्र आकाशची यातच गेली. त्याला काय करावं काहीच सुचेना. त्याच्या डोळ्यासमोर सतत तेच चित्र येऊ लागले. तो बेडवर पडून अस्वस्थ होऊ लागला. मनात कित्येक विचारांचा गोंधळ होऊ लागला.
"यापूर्वी ही अस्वस्थता मला कधीच का जाणवली नाही ?? माझ्या शरीरातील त्या गोष्टींना कशाची ओढ लागली हे आता मला जाणवतंय. माझं तारुण्य मला बोलावत आहे. पण मी काय करू काहीच कळतं नाहीये !! तो मोबाईल ,त्यावरच्या त्या गेम्स क्षणार्थात मला कमी महत्त्वाच्या का वाटू लागल्या आहेत ?? मलाच माहीत नाही. नको आकाश !! या मोहात पडू नकोस !! अजून आपण लहान आहोत !! होना? पण मग ही अस्वस्थता ??"

आकाश पुन्हा पुन्हा व्हिडिओज पाहत बसला. त्यात स्वतःला पाहू लागला. आकाश वर्तुळात भरकटून गेला.  

क्रमशः


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...